बारामती : सुप्यात गतीरोधक व सर्व्हिस रोडची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 गतीरोधक टाकण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

बारामती : सुप्यात गतीरोधक व सर्व्हिस रोडची मागणी

सुपे: सुपे बारामती येथील चौफुला-मोरगाव मार्गावर अर्धा किलोमीटरच्या टप्प्यात आठ दिवसात दोन जणांना जीव गमवावा लागला तर चार महिन्यात आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. किरकोळ व गंभीर अपघातांची संख्या मोठी आहे. या मार्गावर तातडीने गतीरोधक टाकण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. सकाळनेही याबाबत दोन दिवसांपूर्वीच अपघात टाळण्यासाठी बातमी दिली होती.

रविवारी रात्री दहाच्या दरम्यान उतारावरून भरधाव आलेला ट्रक थेट हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याच चौकात या आठवड्यात एक आंब्याचा ट्रक कोसळून अपघात झाला होता. गेल्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत येथे अनेकदा जीवघेणे अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सोंड परिसर ते सासवड चौकापर्यंत उड्डाण पुलाची मागणी काही ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली. तीव्र उतार व वळण, अपघाती क्षेत्र आणि वाहन वेग मर्यादे विषयक फलक लावण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

अपघात होऊ नयेत म्हणून या मार्गावर काही ठिकाणी गतीरोधक टाकण्यासाठी सुपे ग्रामपंचायत व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले की, चार महिन्यांच्या कालावधीत या मार्गावर झालेल्या अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला आहे.

आज या रस्त्यावरील अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी करून गती रोधक टाकण्याच्या सुचना ठेकेदारांना करण्यात आल्या. याप्रसंगी पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे, पोलीस अधिकारी सोमनाथ लांडे, ठेकेदार प्रशांत सोनमळे, अंगराज वाबळे आदींसह पत्रकार उपस्थित होते. दोन दिवसात गती रोधक टाकण्यात येतील अशी माहिती या वेळी सोनमळे यांनी दिली.

या वळणावर व परिसरात अनेकदा अपघात होतात याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांशी चर्चा करून अपघात टाळण्यासाठी आवश्यकती उपाय योजना व गतीरोधक टाकण्याच्या सुचना करत आहे.

संभाजी होळकर- तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बारामती

या मार्गावर वाहने व लोकांची वर्दळ वाढल्याने गावातून जाणाऱ्या महामार्गालगत सर्व्हिस रोड करण्याची गरज आहे. दुकानातून बाहेर पडले की लगेच महामार्ग असल्याने काही क्षणात अपघात होतात म्हणून सर्व्हिसरोड होणे गरजेचे आहे.

दिलीप खैरे- माजी प्रशासक पुणे बाजार समिती

Web Title: Baramati Demand Speed Limit Service Road Supya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top