बारामतीहून 'या' मार्गांवर धावणार लालपरी...

मिलिंद संगई
Tuesday, 22 September 2020

राज्य सरकारने एसटीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी दिल्यानंतर बारामती आगारानेही आता पूर्वीप्रमाणेच वाहतुकीचे नियोजन केल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 

बारामती (पुणे) : राज्य सरकारने एसटीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी दिल्यानंतर बारामती आगारानेही आता पूर्वीप्रमाणेच वाहतुकीचे नियोजन केल्याची माहिती आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

बारामतीहून प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे, नीरा, फलटण, भिगवण, बीड, जालना, धुळे, कर्जत, राशीन, नगर, जामखेड या मार्गावर गाड्या धावणार आहेत. लॉकडाउननंतर प्रथमच मोठ्या उत्साहाने एसटीने आपले कामकाज सुरू केले असून प्रवाशांच्या सेवेसाठी कर्मचारी सज्ज असल्याचे गोंजारी यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे बंधनकारक असून राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करणे गरजेचे राहणार आहे. सर्व बसच्या तिकिटांचे दर लॉकडाउन अगोदर जे होते त्याच प्रमाणे असतील, बारामतीहून पुण्याला जाणाऱ्या गाड्या या विनाथांबा नसतील तर त्या प्रमुख स्थानकांवर थांबून पुण्याला जाणार आहेत. 

वेळापत्रक पुढीलप्रमाणे 
बारामती- स्वारगेट (मोरगाव मार्गे) : सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी 
बारामती- स्वारगेट (नीरा मार्गे) : सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी. 
 बारामती-नीरा : सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी 
बारामती- भिगवण : सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी 
बारामती-बीड : सकाळी दहा वाजता 
 बारामती-सातारा : सकाळी आठ व दुपारी दोन वाजता 
बारामती-धुळे : सकाळी सहा वाजता (कर्जत, राशीन, मिरज, नगर मार्गे) 
बारामती-जालना : सकाळी साडेदहा (जामखेड, बीड मार्गे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Baramati depot also now has the same ST schedule as before