
--कल्याण पाचांगणे
माळेगाव : बारामती जिल्हा बँकचे कामकाज रात्री ११ वाजता सुरू ठेवणे, माळेगाव कारखान्यात भिजलेल्या साखर पोत्यांची विरोधकांकडून पाहणी करणे, आदी आक्षेपार्ह मुद्यांच्या आधारे विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे आदी कार्य़कर्त्यांनी संबंधित संस्थांच्या प्रशासनाला व पदाधिकार्यांना धारेवर धरले. परिणामी सत्ताधारी व विरोधकांमधील वरील वाद थेट पोलिस ठाणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत पोचला आहे. परिणामी माळेगावात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसते. दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यानीही आरबीआय व नाबार्ड या संस्थांनी वरील प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.