Baramati police arrest a man accused of posing as an IPS officer and cheating a youth of ₹7.85 lakh with a fake government job promise.
esakal
बारामती : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून अन्न व औषध प्रशासन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणाची ७ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतया आयपीएस अधिकाऱ्याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली. तोसीन इब्राहिम मणियार (रा. सय्यद पाटकर वस्ती, बारामती) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.