

Baramati Court Pronounces Life Imprisonment
Sakal
बारामती : वडील व मुलीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायाधिशांनी तिघांना जन्मठेपेसह (आजन्म कारावास) 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशाल सोपान वत्रे (रा. मनसरवाडी, ता. दौंड), जयदीप जयराम चव्हाण (रा. येडेवाडी लिंगाळी, ता. दौंड) व केरबा नारायण मेरगळ (रा. मेरगळमळा, मसनरवाडी, ता. दौंड) या तिघांना येथील जिल्हा तदर्थ न्यायाधिश श्रीमती एस.आर. पाटील यांनी जन्मठेप व 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.