Malegaon News : बारामतीतील शेतकऱ्यांची मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे धाव; तातडीने पाणी सोडण्याची मागणी

निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानकपणे बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून राहिले वंचित.
Baramati Farmers Approach Deputy CM Sunetra Pawar in Mumbai

Baramati Farmers Approach Deputy CM Sunetra Pawar in Mumbai

sakal

Updated on

माळेगाव - निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानकपणे बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे. परिणामी ऊसासह चारा पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मेखळी, घाडगेवाडी, निरावागज, गुणवडी, मळद आणि खांडज येथील शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com