
बारामती : परिश्रमाने अशक्य ते शक्य करता येते ही बाब बारामती तालुक्यातील कोळोली येथे सातव कुटुंबीयांनी सिद्ध करून दाखविली आहे. ठिबक सिंचनाचा वापर करीत पाणी आणि खत व्यवस्थापनाचा अचूक मेळ साधत जिरायती परिसरात पाच एकरांमध्ये केळीची यशस्वी लागवड केली. त्यांनी नुकताच पहिला कंटेनर इराणकडे रवाना केला.