

Baramati Liquor Seizure
esakal
बारामती: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत मद्य वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहिम हाती घेतली आहे. या अंतर्गत मोठी कारवाई करत सुमारे 6 लाख 97 हजार रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा आणि एक चारचाकी वाहन या विभागाने जप्त केले आहे. अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.