

Baramati Ganesh Festival Seven Face Police Case Over Alleged Obscene Dance And Gestures During Ganesh Visarjan Procession
sakal
-चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव, अंगविक्षेप व बीभत्स नृत्य केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोऱ्हाळे बुद्रुक ता बारामती येथील माळशिकारेवाडी परिसरात बुधवारी (ता. २३) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.