बारामतीत भक्तिभावाने श्रींची प्राणप्रतिष्ठा

बारामतीत भक्तिभावाने श्रींची प्राणप्रतिष्ठा
Published on

बारामती, ता. १४ : ओसंडून वाहणारा उत्साह, भक्तिभाव आणि अत्यंत श्रद्धेने बारामतीकरांनी आज विघ्नहर्त्याला वाजत गाजत घरी नेले. गणरायाच्या आगमनाचा आबालवृध्दांच्या चेहऱ्यावर आनंद काही वेगळाच होता.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस भिगवण रस्त्यावर तसेच शहरातील बाजारपेठेत जागोजागी गणेशमूर्ती विक्रीसह सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्याचे स्टॉल्स लावलेले होते. सकाळपासून गणेशभक्तांनी मूर्ती खरेदीसह इतर आवश्यक सामान खरेदीसाठी गर्दी केली होती.
अनेक दिवसानंतर बारामतीच्या बाजारपेठेत सोमवारी (ता. १४) उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेकांनी पारंपरिक पोषाख करून डोक्यावर टोपी ठेवून लाडक्या गणरायाला उत्साहात व भक्तिभावाने घरी नेले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या गणरायास मिरवणुकीने मंडळाच्या मंडपात नेले.
इलेक्ट्रीक माळा, सजावटीचे साहित्य, हार फुले, मोदक यासह इतरही वस्तूंच्या खरेदीसाठी बारामतीची बाजारपेठ फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुचाकी व चारचाकीमधून लोकांनी लाडक्या विघ्नहर्त्याला घरी नेले.
दरम्यान बारामती शहर व बारामती तालुका पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, पोलिस निरिक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी व नारायण पवार यांनी दिली.

उत्साह मात्र दुःखाचे सावट....
शहरात अनेक सार्वजनिक मंडळांनीही श्रींची प्राणप्रतिष्ठा केली. मात्र यंदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे शहरातील सर्वच मंडळांनी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. अत्यंत साध्या पद्धतीने यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शहरातील बहुसंख्य मंडळांनी घेतलेला आहे. गणेशोत्सवाचा एकीकडे उत्साह असला तरी अजितदादा नसल्याचे दुःखाचे सावटही सर्वच मंडळांवर स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com