महिलेस अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या होमगार्डला बारामतीत अटक

एका महिलेस अश्लिल मेसेज पाठवून तिला मनस्ताप देणा-या होमगार्डला पोलिसांनी गजाआड केले.
अत्याचारप्रकरणी अटक
अत्याचारप्रकरणी अटकsakal
Updated on

बारामती : एका महिलेस अश्लिल मेसेज पाठवून तिला मनस्ताप देणा-या होमगार्डला पोलिसांनी गजाआड केले. अभिजीत विजय हटकर (रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) असे अटक केलेल्या होमगार्डचे नाव आहे. या होमगार्डचे एका मित्राच्या घरी जाणे येणे होते. या ओळखीतून त्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यांच्यात एक दोन वेळा संवादही झाला होता. त्या नंतर सोशल मिडीयातून त्याने मित्राच्या पत्नीच्या फोटोत बदल करुन अश्लिल इमेज करुन त्या महिलेला पाठवले. त्या नंतर हा फोन त्याने बंद करुन ठेवला होता.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस नाईक किरण कदम व अतुल जाधव यांनी या बाबत सखोल तपास केला. सुरवातीला या होमगार्डने उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला.

अत्याचारप्रकरणी अटक
खासदार असदुद्दीन ओवेसी लवकरच सोलापूरच्या दौऱ्यावर

तातडीने कारवाई करणार

महिलांसंदर्भात आलेल्या तक्रारी व दाखल गुन्ह्यांसंदर्भात तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही नूतन पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे. या प्रकरणातही तातडीने तपास करुन होमगार्ड असलेल्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केला आहे. त्या मुळे या पुढील काळात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना तपासात प्राधान्य दिले जाणार असल्याचे महाडीक यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com