Baramati News : बारामतीत अनधिकृत जाहिरातबाजीवर आता निर्बंध येणार; उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचाच गुन्हा दाखल होणार
Banner Ban : बारामती नगरपरिषद हद्दीत अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, जाहिरातींवर बंदी घालण्यात आली असून, उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयीन गुन्हा दाखल केला जाणार आहे.
बारामती : येथील नगरपरिषद हद्दीत या पुढील काळात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, जाहिराती, इतर कोणतीही आकाशचिन्हे या बाबी लावता येणार नाहीत. नियमबाह्य पध्दतीने अशी कृती केल्यास संबंधितांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.