बारामती, इंदापूर, दौंड पुरंदरला अतिवृष्टीची सर्वाधिक झळ!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज (ता.१५) जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिला आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची सर्वाधिक झळ बसलेल्या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र समन्वयक अधिकारी जिल्हाधिकारी देशमुख यांनी नियुक्त केला आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना बुधवारी (ता.१४) झालेल्या अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. मात्र  बारामती, इंदापूर, पुरंदर आणि दौंड या चार तालुक्यांना अतिवृष्टीची सर्वाधिक झळ बसली आहे. 

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज (ता.१५) जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिला आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीची सर्वाधिक झळ बसलेल्या चार तालुक्यांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र समन्वयक अधिकारी जिल्हाधिकारी देशमुख यांनी नियुक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख यांच्याकडे बारामती तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांच्याकडे इंदापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांच्याकडे पुरंदर आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांच्याकडे दौंड तालुक्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

काल बारामतीत जिल्ह्यात सर्वाधिक १२८.७५ मि.मी. पाऊस झाला आहे. इंदापूर तालुक्यात ११६.८२ मि.मी., दौंडमध्ये १०१.५० मि.मी. तर पुरंदर तालुक्यात ८७.५७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 
 
#PuneRains : भिगवणमध्ये घरे, दुकाने, बॅंकेत पावसाचे पाणी; कोटयवधीचे नुकसान
 
अन्य तालुक्यातील पाऊस (मि.मी.मध्ये) 

- हवेली - ७६.४०.
- मुळशी - ६९.१७.
- भोर - ९१.२५.
- मावळ - ६१.०६.
- वेल्हे - ६४.७५.
- जुन्नर - ६६.८९.
- खेड - ७४.८९.
-आंबेगाव -६२.६०.
- शिरूर - ५७.२२.

समन्वयक अधिकारी संपर्क क्रमांक

- विजय देशमुख (बारामती) - ९८२२१०९९६६

- भारत शेंडगे (इंदापूर) ---- ९४२२०२०६०५

- संभाजी लांगोरे (पुरंदर) ---- ९८८१९५९७५९

- संदीप कोहीनकर (दौंड) ---- ९०११३८९४३९

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati, Indapur, Daund Purandar are mostly affected area in pune district

टॉपिकस
Topic Tags: