esakal | बारामतीत नीरा डाव्या कालव्याला भगदाड 
sakal

बोलून बातमी शोधा

nira canal

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आठ मोरी परिसरात नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे कालवा बंद करण्यात आला आहे. 

बारामतीत नीरा डाव्या कालव्याला भगदाड 

sakal_logo
By
चिंतामणी क्षीरसागर

वडगाव निंबाळकर (पुणे) : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आठ मोरी परिसरात नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे कालवा बंद करण्यात आला आहे. 

पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात

वडगाव निंबाळकर येथील आठ मोरी परिसरात गेल्या अनेक दिवसापासून कालव्यातून पाण्याची गळती सुरू होती. मात्र, वाहून आलेले पाणी ओढ्यात मिळत असल्याने या गळतीकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. परिणामी गळतीचे रूपांतर मोठ्या घळीमध्ये झाले. त्यातून गुरुवारी (ता. 11) सायंकाळी कालवा निरीक्षक शरद मोरे हे कालव्यावरून जात असताना गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पाटबंधारे शाखाधिकारी बाजीराव पोंद्‌कुले यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने लगतच्या शेतकऱ्यांना मदतीला घेऊन माती भरलेली पोती गळती होत असलेल्या भागात आतून व बाहेरून टाकली. पण, याचा फारसा उपयोग झाला नाही. 

आपल्या शेतकऱ्याला मार्केटिंग ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे, अमोल कोल्हे यांची भूमिका

उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. गुरूवारी 750 क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग कालव्यामधून चालू होता. तो कमी करून 400 क्‍यूसेक करण्यात आला. परंतु, यावरही गळती न थांबल्याने शुक्रवारी (ता. 12) कालवा पूर्ण बंद करण्यात आला. शनिवारी (ता. 13) पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर गळती थांबविण्यात यश येऊ लागले. रविवारी (ता. 14) भरावाला आतून कॉंक्रीट करत काम करण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या परिसरात कालव्याला भगदाड पडण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षी मोरीच्या पुढच्या तोंडाला भगदाड पडले होते. या वेळी मागच्या तोंडाला भगदाड पडले आहे. याच भागात सतत गळती होत असल्याने असे प्रकार घडत आहेत.