स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबत सोमवारी महाविकास आघाडीची भूमिका ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबत सोमवारी महाविकास आघाडीची भूमिका ठरणार

बारामती - आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढाव्यात की नाही या बाबतचा निर्णय सोमवारी मुंबईत गेल्यावर एकत्र बसून घेतला जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिली. बारामतीत माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पंधरा वर्षांपासून एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यावा हा अधिकार जिल्हा स्तरावर द्यायचो, प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती व कार्यकर्त्यांच म्हणण वेगळ असत, तरीही राज्यस्तरावर जो निर्णय घेतला जाईल तो संबंधितांना कळविला जाईल. मी स्वताः पुणे जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांशीही या बाबत चर्चा करणार आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूका जाहिर केल्यामुळे त्याला सामोरे जावे लागणार आहे, सध्या कोकणात पाऊस सुरु आहे, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आता निवडणूका जाहिर झाल्यामुळे सर्वांपुढेच पर्याय नाही, न्यायालयात जाऊ शकतात पण न्यायालयातही एकदा निवडणूक जाहिर झाल्यानंतर त्यात बदल करत नाही असा अनुभव आहे.

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या योजनांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, या बाबत मी मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलेन, मीही या बातम्या वाचल्या आहेत, ज्या मान्यता दिल्या आहेत, तो जिल्हा नियोजन समितीला निधी दिला होता, या बाबतचा अधिकार त्यांच्याकडे असला तरी का हा निधी थांबविला आहे या बाबत मी विचारण्याचा आम्हाला लोकशाही मध्ये अधिकार आहे, आम्ही तो विचारु. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून मगच या बाबत भूमिका मांडू.

ओबीसी आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटा जमा झाल्याची माहिती आहे, मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळायला हवे अशी सर्वांचीच भूमिका आहे, ओबीसी वर्गाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी अशी आमची भूमिका आहे.

Web Title: Baramati Local Body Elections Mahavikas Aghadi Meeting On Monday Ajit Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top