Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघात गृहभेटीत २२८ जणांचे मतदान

चार विधानसभा मतदारसंघातील पूर्वनोंदणी केलेल्या एकूण २८४ मतदारांपैकी या मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज २२८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
baramati lok sabha constituency 228 vote from home politics
baramati lok sabha constituency 228 vote from home politicsSakal

Pune News : पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड आणि भोर या चार विधानसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.२) प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या घरी जाऊन, त्यांचे मतदान करून घेतले.

या चार विधानसभा मतदारसंघातील पूर्वनोंदणी केलेल्या एकूण २८४ मतदारांपैकी या मोहिमेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज २२८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केलेल्या एकूण मतदारांमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ९९ मतदारांचा समावेश आहे. या मोहिमेत इंदापूरमधील ६६, दौंडमधील ३९ तर, भोरमधील २४ मतदारांनी मतदान केले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मिळून एकूण १०६ जणांनी घरच्या घरीच मतदानाची परवानगी मिळण्यासाठीची पूर्वनोंदणी केली होती. परंतु यापैकी एक मतदार गंभीर प्रकृतीमुळे मतदान करून शकला नाही तर,

अन्य सहा मतदारांचा नोंदणीपासून ते मतदान प्रक्रियेपर्यंतच्या कालावधीत मृत्यू झाला असल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व गणेश शिंदे यांनी सांगितले.

दौंड विधानसभा मतदारसंघातील ५६ मतदारांनी पूर्वनोंदणी केली होती. त्यापैकी २९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. दौंडमध्ये ४६ ज्येष्ठ नागरिकांपैकी २९ जणांनी आणि १२ दिव्यांगांपैकी १० जणांनी मतदान केले असल्याचे दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी सांगितले.

भोर विधानसभा मतदारसंघातील २४ मतदारांनी मतदानाच्या पहिल्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये भोर तालुक्यातील १८ आणि मुळशी तालुक्यातील ६ मतदारांचा समावेश असल्याचे भोरचे प्रांत राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

वेल्ह्याचे तहसीलदार निवास ढाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांच्या मतदानाची प्रक्रीया पार पडली. भोर मतदारसंघातील ज्येष्ठ आणि दिव्यांग असलेल्या ५१ मतदारांकडून घरांमधून मतदान करण्यासाठी १२ डी फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत. यामध्ये भोर तालुक्यातील ४२, वेल्ह्यातील १ आणि मुळशीतील ८ मतदारांचा समावेश आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात ६६ मतदारांनी गृहभेटीत मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये ८५ वर्षांच्यावरील ५५ ज्येष्ठ नागरिक आणि अकरा दिव्यांगांचा समावेश आहे. अन्य दोन मतदारांनी मतदान करण्यास नकार दिल्याने, त्यांचे मतदान होऊ शकले नाही.

अन्य एका मतदारांचा नोंदणी ते मतदान प्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला असल्याचे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मतदान घेण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com