पुणे झेडपीवर 'या' मतदारसंघाचे वर्चस्व; सहापैकी चार पदे पदरात

गजेंद्र बडे
Friday, 24 January 2020

  • शिरूर, मावळची प्रत्येकी एका पदावर बोळवण

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सहा कारभाऱ्यापैकी तब्बल चार पदे पटकावत बारामती लोकसभा मतदारसंघाने झेडपीवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. शिरूर आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघाची मात्र प्रत्येकी एका पदावर बोळवण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील अडीच वर्षातील पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत बारामती लोकसभेने आणखी एक जादा पद मिळविले आहे. यामुळे शिरूर लोकसभेतील एका पदाधिकारी पदात घट झाली आहे. दरम्यान, यामुळे बारामती, दौंड आणि हवेली या तीन तालुक्यांना सलग दुसऱ्यांदा झेडपीच्या कारभारी पदावर संधी मिळाली आहे. खेड, मावळ आणि भोर या तीन तालुक्यांना मात्र काही कालखंडानंतर यंदा नव्याने पदाधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली आहे.

आता प्रीतम मुंडे यांची फेसबुक पोस्ट व्हायरल

बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी केवळ इंदापूर आणि पुरंदर हे दोनच विधानसभा मतदारसंघ पदापासून वंचित राहिली आहेत. त्यातही पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील केवळ इंदापूर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ झेडपीच्या कारभारी पदापासून वंचित रहिला आहे. या मतदारसंघातील भोर विधानसभा मतदारसंघातील रणजित शिवतारे हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. बारामती विधानसभेतील प्रमोद काकडे हे बांधकाम, दौंडमधील सारिका पानसरे या सामाजिक न्याय आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पुजा पारगे या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत.

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे या शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड विधानसभा मतदारसंघातील आहेत. नवे कृषी समिती सभापती बाबूराव वायकर हे मावळ लोकसभा मतदारसंघातील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Lok Sabha constituency dominated by Pune ZP