Baramati Lok Sabha: बारामती लोकसभा मतदारसंघात खरी लढत काका-पुतण्यातच! कौटुंबिक लढाईत कोण मारणार बाजी? उत्सुकता शिगेला

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार हे पवार कुटुंबीयांतीलच दोन उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकणार असल्याने मतदार कोणाला कौल देतात, याकडे देशाचे लक्ष असेल.
Baramati Lok Sabha
Baramati Lok SabhaEsakal

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासातील सर्वात औत्सुक्यपूर्ण लढत यंदा होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सभा होऊनही पवार कुटुंबीयांनी या मतदारसंघावर पकड कायम ठेवली. आता मात्र सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार हे पवार कुटुंबीयांतीलच दोन उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकणार असल्याने मतदार कोणाला कौल देतात, याकडे देशाचे लक्ष असेल. येथे खरी लढाई ज्येष्ठ नेते शरद पवार व त्यांचा पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच आहे.

विद्यमान खासदार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार असतील. येत्या आठवड्यात दोन्हीही उमेदवार आपले अर्ज दाखल करतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान सात मे रोजी होणार आहे. इतर कोणते उमेदवार अर्ज दाखल करतात व ते किती मते घेतात, हे गणितही चुरशीच्या लढतीत महत्त्वाचे ठरेल.

Baramati Lok Sabha
Weather Update: पुन्हा रेनकोट, छत्र्या बाहेर काढा; नागपुरात मुसळधार, तर राज्यात गारपिटीसह पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पाडून भाजप- शिवसेनेसोबत जात अजित पवार यांनी ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तेथेच कौटुंबिक फूटही समोर आली होती. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी भाजपसोबत न जात संघर्षाची भूमिका घेतली. कधी नव्हे ते पवार कुटुंबीयांतीलच दोन उमेदवार आणि तेही खुद्द बारामतीत परस्परांसमोर उभे ठाकले. वर्षानुवर्षे एकसंध असलेल्या कुटुंबातील राजकीय संघर्ष आता बारामतीकरांनी मान्य केला असून, प्रत्येकाने आपापली बाजू व भूमिका ठरवत आपापल्या नेत्यांचा प्रचार सुरु केल्याचे आता दिसत आहे.

Baramati Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सामंत की राणे? उमेदवार ठरायच्या आधीच भाजपची प्रचारात मुसंडी

माजी मंत्री विजय शिवतारे व हर्षवर्धन पाटील यांची समजूत घालत महायुतीच्या प्रचाराला लावण्याचे काम मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले. महायुतीतील समन्वय उत्तम असल्याचे चित्र आहे. सर्वांचाच एकमेकांशी सुसंवाद असून अनेकदा तो दिसला. तसेच, शरद पवार यांनी जुन्या सहकाऱ्यांना आणि विरोधी पक्षातील नाराजांना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी थेट त्यांच्या पक्षात प्रवेश केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या बाजूने अजित पवार (बारामती), दत्तात्रेय भरणे (इंदापूर), भीमराव तापकीर (खडकवासला), राहुल कुल(दौंड) हे आमदार आहेत. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे सुनेत्रा पवार यांच्या, तर कॉँग्रेसचे आमदार संजय जगताप (पुरंदर) व संग्राम थोपटे (भोर), उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉँग्रेस हे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ प्रचार करीत आहेत.

Baramati Lok Sabha
Uddhav Thackeray: शिवसेना नकली असायला तुमची डिग्री आहे का?; उद्धव ठाकरेंचे PM मोदींना प्रत्युत्तर

एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी मतदारांच्या मनात असलेली सहानुभूती, सुप्रिया सुळे यांचे तीन वेळच्या खासदारकीचे संसदेतील काम; तर दुसरीकडे अजित पवार यांनी बारामतीत केलेला विकास, तसेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे, हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा कल शरद पवार यांच्याकडे, तर युवा वर्गाचा काही प्रमाणात कल अजित पवारांकडे, असे साधारण चित्र मतदारसंघात आहे. मराठा व धनगर समाजाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरेल.

सहा विधानसभेतील चित्र

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी असून वेगळे मुद्दे व राजकीय पार्श्वभूमी असल्याने नेमके काय घडणार, याबाबत उत्सुकता आहे. सुप्रिया सुळे यांना गेल्या निवडणुकीत बारामतीने सर्वाधिक मताधिक्य दिले होते, त्यांच्या विजयात बारामतीचा मोठा वाटा होता. यंदा सुनेत्रा पवार उमेदवार असल्याने बारामतीत मतांची विभागणी अटळ आहे.

Baramati Lok Sabha
Baramati Lok Sabha Election 2024 : लेकीसाठी बाप मैदानात! काकडे, तावरे, थोपटेंच्या भेटीमागे शरद पवारांचं गणित काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com