Baramati Loksabha: तुतारी कोणाची? बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह; शरद पवार गटाची निवडणूक आयोगात धाव

Baramati Loksabha: राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. काही ठिकाणी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Baramati Loksabha 2024
Baramati Loksabha 2024Esakal

Pune News : राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. काही ठिकाणी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी काल (सोमवारी) उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर दुसऱ्या एका उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसभेच्या निवडणूक चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून शरद पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Baramati Loksabha 2024
Parth Pawar Y+ Security: निवडणुकीच्या धामधुमीत पार्थ पवारांना थेट वाय प्लस कॅटेगरीची सिक्युरिटी, कारणांची चर्चा

बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीतील निवडणुकीसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची 20 एप्रिलला पडताळणी झाली. त्यामध्ये पाच अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर 46 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणामध्ये राहिले आहेत.या 38 उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

Baramati Loksabha 2024
Mumbai Crime News: मुदतपूर्व सुटकेचा मार्ग मोकळा; कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या

दरम्यान बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमामध्ये 'तुतारी' या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे.

मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने तुतारी हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आलेला आहे.त्यामुळे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतच्या आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे.

Baramati Loksabha 2024
लोकसभेनंतर ८ महिन्यांत दोन मोठ्या निवडणुका! आता उमेदवारांच्या प्रचारात भावी आमदार, भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचीच सर्वाधिक लुडबुड

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राला वाटप केलेली चिन्हे आहेत. या चिन्हांबाबत काही आक्षेप असल्यास त्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. सुहास दिवसे यांनी सागितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com