Rohit Pawar : चारशे पार तर सोडाच पण दोनशेचा टप्पा सुध्दा पार होवू शकत नाही

बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्राचारार्थ वरवंड (ता. दौंड) येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रोहीत पवार बोलत होते.
rohit pawar
rohit pawar Sakal

वरवंड - शरद पवार ८४ वयात लढत आहे. त्यांनी आजपर्यंत समाजाला न्याय देण्याचे काम केले. मात्र, मोदी सरकार लोकांच्या अडचणी बद्दल बोलत नाही. उलट शेती विरोधी धोरण राबवुन शेतकऱयांचे मोठे नुकसान केले. देशात सत्ता बदल होणारच आहे. अहो चारशे पार तर सोडाच पण दोनशेचा टप्पा सुध्दा पार होवू शकत नाही. असे ठाम मत कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्राचारार्थ वरवंड (ता. दौंड) येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रोहीत पवार बोलत होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, अजित शितोळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.

रोहीत पवार म्हणाले,अजित पवार यांनी शब्द पाळला नाही. ते सोडुन गेले तरी जनता आमच्या बरोबर आहे. दौड तालुक्याची जनता स्वाभीमानी आहे. यावेळी सुप्रिया सुळेंना मोठया मताधिक्याने निवडुन देणार आहे. या अगोदर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या विरोधात बोलत होते. आता मांडीला माडी लावुन अगदी पेढा भरवत आहे.हे जनतेला पटले नाही.

सरकारने शेत मालाची बिकटपरीस्थीती केली. कांदा, उस, दुध उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. सरकाराने शेतकऱयांपेक्षा कंपन्यांचा विकास केला. भाजपचा पुण्यातुन एकही खासदार निवडुन येणार नाही. असा ठाम विश्वास रोहीत पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी गावातील दिपक दिवेकर यांनी पाटबंधारे विभागाला मागणी करुन देखील तलावात पाणी सोडले नाही. त्यामूळे ग्रामस्थांना पाणी टंचाइचा सामाना करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली. यावर पवार यांनी तलावात पाणी सोडण्या संदर्भात अधिकाऱयांशी चर्चा केली असल्याचे सांगितले.

यावेळी काहींनी माइकचा ताबा घेत शरद पवार यांच्या कार्याचे कौतुक करीत सध्याची शेतकऱयांची परीस्थीती मांडली.

दिपक दिवेकर व भालचंद्र शितोळे यांनी सुत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com