बारामती बाजार समितीत शेतीमाल लिलाव पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

बारामती - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार शेतीमालाचे लिलाव आजपासून पूर्ववत सुरू झाले. २७ ऑगस्ट रोजी गुळाचा लिलाव झाला होता. आज बहुतेक सर्वच भुसार शेतीमालाचे लिलाव झाले. 

हमीभावानुसार शेतीमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा, एक वर्षाचा तुरुंगवास व ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षेची तरतूद करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यावरून व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारला होता. 

त्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. दंड व शिक्षेच्या तरतुदीचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे सरकारने जाहीर केल्यानंतर आज भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. मागील सोमवारीच शेतकरी संघटनांनी जीवनावश्‍यक वस्तू कायद्याखाली व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे सोमवारीच व्यापाऱ्यांनी आपले गाळे सुरू केले होते. मात्र त्या दिवशी केवळ गुळाचाच लिलाव झाला. आज मात्र सर्व लिलाव पूर्ववत सुरू झाले.

शेतीमाल तारण योजना सुरू - हिवरकर
शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल वाळवून स्वच्छ करून विक्रीस आणावा. त्यांना लिलावात भाव कमी मिळत आहे असे वाटले, तर संबंधित शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या गोदामात ठेवावा, त्यासाठी शेतीमाल तारण योजना सुरू आहे. दरसाल दरशेकडा ६ टक्के व्याजदराने ७५ टक्के रकमेचे कर्ज मिळेल. दुसरीकडे शेतीमालाच्या विक्रीसाठी बाजार समिती सरकारकडे शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी करणार आहे. ही केंद्रे वर्षभर सुरू ठेवावीत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केल्याने सरकारकडे तशी मागणी केली जाईल, असे बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baramati market committee agriculture goods auction