बारामतीत महावितरणच्या अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

उर्जा भवन कर्मचारी वसाहतीतील आपल्या सदनिकेत त्यांनी गळफास घेत जीवनप्रवास संपविला.
आत्महत्या
आत्महत्या sakal

बारामती: येथील महावितरणचे अभियंता मनीष माधवराव दंडवते (वय 43) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. उर्जा भवन कर्मचारी वसाहतीतील आपल्या सदनिकेत त्यांनी गळफास घेत जीवनप्रवास संपविला.

आत्महत्या
सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच लाठीचार्ज केला; शिवसेनेचा आरोप

आज सकाळी डबेवाला त्यांना डबा देण्यासाठी आला, त्यांनी घराचा दरवाजा उघडला नाही, त्या मुळे त्याने खिडकीतून डोकावले असता त्याला किचनमध्ये नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्या नंतर पोलिस निरिक्षक सुनील महाडीक व फौजदार गणेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, दरवाजा तोडून त्यांना खाली घेण्यात आले.

आत्महत्या
सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच लाठीचार्ज केला; शिवसेनेचा आरोप

मनीष दंडवते बारामतीत एकटेच राहत होते, त्यांचे कुटुंबिय सोलापूर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या कुटुंबियांना या बाबत माहिती देण्यात आली. दंडवते यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे अद्याप स्पष्ट न झाल्याचे पोलिस सूत्रांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com