सोमय्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच लाठीचार्ज केला; शिवसेनेचा आरोप

सोमय्या यांच्या माकड हाडाला मुक्का मार लागला असून त्यांना संचेती रुग्णालयात दाखल केले आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSakal

पुणे : पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) सायंकाळी साडे चारच्या सुमारास महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोमय्या यांना घेरण्याचा प्रयत्न करत असलेल्या सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना अडविले. त्यावेळी जोरदार धक्काबुक्की होऊन सोमय्या हे पायरीवरून खाली पडले. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी आम्ही धक्काबुक्की केली नाही. तर उलट सुरक्षा रक्षकांनीच आमच्यावर लाठीचार्ज केला, महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप केला. तर सोमय्या यांनी शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असे ट्विट केले आहे.(Pune Corporation Attack On kirit Somaiya)

किरीट सोमय्या सायंकाळी साडे चारच्या सुमारास महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते याची कुणकूण लागल्याने शिवसैनिक महापालिकेत आले. पण सोमय्या हे नवीन प्रशासकीय इमारतीतील गेटने महापालिकेत येणार असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली. त्यामुळे शिवसैनिक घोषणाबाजी करत नवीन इमारतीकडे गेले. त्यानंतर सोमय्या यांची गाडी जुन्या इमारतीच्या दिशेने आली. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना तीन-चार शिवसैनिकांनी त्यांना अडवले.

Kirit Somaiya
वसंत पंचमीच्या मुहुर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

"तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाहीत, ठरावीक प्रकरणावर का लक्ष देता " असा जाब विचारला. त्यावर सोमय्या यांनी "मला माहिती द्या मी त्याबद्दल ही प्रशासनाशी बोलतो" असे सांगून निघाले. त्याच वेळी नव्या प्रशासकीय इमारती कडून शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत पळत पुन्हा जुन्या इमारतीमध्ये येऊन सोमय्या यांना गाठले. सुरक्षारक्षकांचे कडे तोडून सोमय्या यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण झेड सुरक्षा असलेल्या सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना रोखले. पण आक्रमक झालेले शिवसैनिक तुटून पडले सोमय्या तुटून पडणार अशी स्थिती असल्याने सुरक्षा रक्षकांनी शिवसैनिकांना मागे ढकलले. सोमय्या यांना तेथून घेऊन जात असताना पायऱ्यांवरून सोमय्या खाली पडले.

सुरक्षारक्षकांनी त्यांना धरून गाडीत बसविले. तरीही शिवसैनिक शांत झाले नाहीत. त्यांनी घोषणाबाजी करत गाडीच्या काचेवर, बॉनेटवर जोरजोरात हाताने मारले. यावेळी सुरक्षारक्षकांनाही धक्काबुक्की झाली. कसेबसे सोमय्या यांची गाडी बसून महापालिकेतून बाहेर जात असताना शिवसैनिकांनी गाडीचा पाठलाग सुरू ठेवत काचेवर, बॉनेटवर हाताने मारणे सुरूच ठेवले. बाहेर जातानाच्या गेटवर काही काळ गाडी अडविण्यात आली. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आवरते घ्यायला लावत गाडी बाहेर जाऊ देण्यास मदत केली.

Kirit Somaiya
खुणाच्या गुन्ह्यातील १ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

शिवसैनिकांकडून आक्रमक आंदोलन केल्याने महापालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली. सोमय्या गेल्यानंतरही काहीकाळ शिवसैनिकांनी महापालिकेत समोर जोरदार घोषणाबाजी केली. ही घटना झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून याप्रकरणाचा तपास सुरू केला.

‘‘सोमय्या यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावही बोलावे यासाठी आम्ही निवदेन देण्यासाठी आलो होतो, पण सोमय्या यांनी आमचे निवदेन स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली, लाठीचार्ज केला, महिलांचा विनयभंग केला. मी नवीन इमारतीमध्ये असताना हा प्रकार झाला. सुरक्षा रक्षकांनी अशा पद्धतीने वर्तन केल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हाताने मारले.’’

- संजय मोरे, शहर प्रमुख, शिवसेना

‘‘मी आज महापालिकेत गेलो असता शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला.’’

-किरिट सोमय्या, भाजप नेते. ट्विट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com