

बारामती - बहुप्रतिक्षित नगरपरिषद निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर बारामतीत आता इच्छुकांची लगबग सुरु झाली आहे. तब्बल नऊ वर्षांच्या कालखंडानंतर नगरपरिषद निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्याही यंदा लक्षणीय असून नगराध्यक्ष पद खुले असल्याने बारामतीच्या प्रथम नागरिकाचा सन्मान प्राप्त करण्यासाठी यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.