sharad pawar ajit pawar
sakal
बारामती - शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने बारामती लोकसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या मार्फत लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. स्थानिक स्तरावर आघाडी करताना भाजप वगळूनच युती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.