NCP Ajit Pawar Opens Its Account in Baramati Municipal Elections 2025
Sakal
बारामती : नगरपरिषदेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने खाते उघडले असून प्रभाग दोन अ मधील उमेदवार अनुप्रिता रामलिंग तांबे या बिनविरोध निवडून जाणार आहेत. या प्रभागात अनुप्रिता तांबे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. मतदानाअगोदरच एक जागा बिनविरोध होणार असल्याचे आज स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण होते.