

Congestion Among Aspiring Candidates
Sakal
बारामती : दरम्यान निवडणूक आयोगाने रविवारी (ता. 16) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तसेच ऑनलाईन सोबतच ऑफलाईनही अर्ज दाखल करण्याची परवानगी दिल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. बारामतीत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले होते. त्यांनी उमेदवाराच्या यादीची निश्चिती करण्यासाठी बैठका केल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांनीही शनिवारी सकाळी गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.