बारामतीकरांना नगरपालिकेने केलंय 'हे' आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने बारामतीचे सर्वेक्षण बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

बारामती : शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने बारामतीचे सर्वेक्षण बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये उपलब्ध मनुष्यबळाचा विचार केल्यास या कामासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नगरपालिकेने दिलेली प्रश्नावली भरुन द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी केले आहे. 

अत्यंत सोपी व काही क्षणात ही माहिती भरुन होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ही माहिती भरुन द्यायची आहे. शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अशी माहिती भरुन देणे गरजेचे असून, नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीकरांनी https://forms.gle/HFhQarkxX9udmAtu8  या  लिंकवर जाऊन आपला फॉर्म नागरिकांनी भरुन द्यायचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Municipality appeal to Peoples of Baramati