Election Commission Challenges Baramati Court Order in Bombay High Court
sakal
बारामती : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बारामती नगरपरिषद निवडणूकीमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज स्विकारण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिका-यांना दिले होते. आता निवडणूक आयोगाने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलेले असून बारामतीतील न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या बाबत त्यांनी अपील दाखल केलेले आहे.