बारामतीत कोरोनाग्रस्तांना आता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार

मिलिंद संगई
Saturday, 6 March 2021

वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे एक कोविड केअर सेंटर सुरू असून नटराज नाट्य कला मंडळ यांचेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतीगृह येथे दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला या पुढील काळात गृहविलगीकरणात राहता येणार नाही, अशा रुग्णाला कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये 14 दिवस राहावे लागणार आहे.  बारामतीतील कोरोना रुग्णाच्या आकड्याने आज पन्नाशी ओलांडल्यानंतर प्रशासनाने तातडीची बैठक घेतली. तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

मुख्याधिकारी किरणराज यादव, उपमुख्यमंत्र्यांचे  विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,  रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे , जेष्ठ नगरसेवक किरण गुजर व अधिकारी उपस्थित होते. या पुढील काळात डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर मध्ये नोंद केल्याशिवाय अथवा वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोगय अधिकारी यांचे शिफारसपत्र असल्याशिवाय कोणत्याही खासगी रूग्णालयाला कोविडचे रूग्ण अॅडमीट करून घेता येणार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे एक कोविड केअर सेंटर सुरू असून नटराज नाट्य कला मंडळ यांचेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतीगृह येथे दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. 

दरम्यान खासगी शिकवणी वर्ग, लग्नकार्यालय व सभागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी भरारी पथकांकडून तपासणी केली जाणार आहे व शासन व प्रशासन यांनी  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसल्यास  कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी मास्क , सॅनिटायझर , सोशल डिंस्टसिंग व शासनाच्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहन विजय पाटील यांनी केले.

असा असेल लसीकरण कार्यक्रम....
8 मार्च  पासून सोमवार , बुधवार , शुक्रवार या दिवशी सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र व रूग्णालयात कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. बारामतीतील महिला हॉस्पिटल व सुपे येथील ग्रामीण रूग्णालयात सोमवार ते शनिवार  कोविड लसीकरण होईल. सदरचे लसीकरण हे विनामूल्य आहे. या लसीकरणासाठी प्रथम 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले असून यानंतर 45 ते 60 दरम्यान वय असलेल्या असाध्य व्याधी असलेल्या नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे.

- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati now Corona Positive will have to be admitted to the Covid Center