धक्कादायक! बारामतीत वृध्दाची विठ्ठल मंदिरातच गळफास घेत आत्महत्या

मिलिंद संगई
Sunday, 8 November 2020

भक्तीमार्गाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या काशिनाथ वणवे यांनी अचानकच जीवन संपविण्याचा निर्णय का घेतला असावा या बाबत चर्चा सुरु आहे. त्यांच्या कुटुंबियांना तर त्यांच्या या कृतीने कमालीचा धक्का बसला असून त्यांनाही कुटुंबप्रमुखाने हा निर्णय का घेतला असावा हे समजेनासे झाले होते. 

बारामती : शहरातील वणवे मळा परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाने आज गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ माजली. काशिनाथ सिताराम वणवे (वय 60) असे या वयोवृध्दाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजून स्पष्ट नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वणवे मळा येथे वणवे यांचे विठ्ठल मंदिर असून गेली अनेक वर्षे ते मनोभावे विठ्ठलाची पूजा अर्चा करीत होते. आज संध्याकाळी मंदीरातच गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविले. 

दरम्यान, या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना कमालीचा धक्का बसला. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले असावे या बाबत अद्याप कोणतीही नेमकी माहिती मिळालेली नसून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भक्तीमार्गाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या काशिनाथ वणवे यांनी अचानकच जीवन संपविण्याचा निर्णय का घेतला असावा या बाबत चर्चा सुरु आहे. त्यांच्या कुटुंबियांना तर त्यांच्या या कृतीने कमालीचा धक्का बसला असून त्यांनाही कुटुंबप्रमुखाने हा निर्णय का घेतला असावा हे समजेनासे झाले होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati an old man committed suicide by strangled in the Vitthal temple

Tags
टॉपिकस
Topic Tags: