बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास वेग येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway
बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास वेग येणार

बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास वेग येणार

बारामती - महत्वकांक्षी असलेल्या बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या (Baramati-Phaltan Railway Route) कामाला (Work) आता अधिक गती देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) व उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. या रेल्वेमार्गासाठी वेगाने भूसंपादन (Land Acquisition) व्हावी या दृष्टिकोनातून स्वतः जिल्हाधिकारी आता या कामाचा दैनंदिन आढावा घेणार आहेत.

बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्ग पैकी फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास गेले आहे. बारामती ते फलटण हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर दक्षिण भारताला जोडणारा हा जवळचा रेल्वे मार्ग ठरणार आहे, त्यामुळे बारामती देखील रेल्वेच्या नकाशावर ठळकपणे येणार आहे.

बारामती ते फलटण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी 13 गावातील 2439 खातेदारांची जमीन अद्याप संपादन करायचे काम बाकी आहे. दोन वर्षे कोविडच्या प्रभावामुळे हे कामही रखडले होते. आता मात्र या कामाला गती प्राप्त होणार आहे. आजपर्यंत फक्त 199 खातेदारांचे जमीन संपादित केली असून 214 पैकी 82 गटातील जमीन संपादनाचे काम पूर्ण झाले आहे.

बारामती ते फलटण रेल्वे मार्गाची लांबी 37.20 कि.मी. इतकी आहे. खाजगी वाटाघाटीने लाटे व माळवाडी या दोन गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्यान आता यापुढील काळात क-हावागज व सोनकसवाडी या ठिकाणी भूसंपादन बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. कटफळ गावातील भूसंपादनासाठी मूल्यांकनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, नेपतवळण, कुरणेवाडी, क-हावागज, थोपटेवाडी, ब-हाणपूर, तांदुळवाडी या ठिकाणी मूल्यांकन होणे बाकी आहे.

या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी 239 कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यापैकी रेल्वे विभागाकडून 115 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम महसूल विभागाला प्राप्त झाली आहे. यापैकी 64 कोटी 86 लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी अद्याप 50 कोटी रुपयांचा निधी महसूल विभागाकडे शिल्लक आहे.

आता स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रिया मनावर घेतली असल्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शक्य तितक्या लवकर भूसंपादन करून ती जमीन रेल्वे विभागाच्या ताब्यात देण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

दृष्टिक्षेपात बारामती फलटण रेल्वे मार्ग…..

• रेल्वेमार्गाची एकूण लांबी 37.20

• रेल्वेमार्गाचे संपादन करायचे क्षेत्र 183. 91 हेक्टर आर

• एकूण गटांची संख्या 296

• संपादित करावयाच्या शिल्लक गटांची संख्या 214

• एकूण खातेदारांची संख्या 2638

• खाजगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली गावे 2

Web Title: Baramati Phaltan Railway Route Land Acquisition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top