बारामती-फलटण राज्यमार्ग वाहतूकीसाठी उद्या होणार खुला   

बारामती-फलटण राज्यमार्ग वाहतूकीसाठी उद्या होणार खुला   

माळेगाव : बारामती-फलटण राज्यमार्गावरील गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतला आहे. परिणामी पाहुणेवाडी हद्दीतील पावसाच्या पाण्याने वाहून गेलेल्या पुलासह रस्त्याचे बांधकाम सुद्धपाळीवर सुरू झाले. पुणे आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा हा महत्वपुर्ण राज्यमार्ग उद्या शनिवार (ता. १७) रोजी दुपारपर्य़ंत वाहतूकीसाठी खूला होईल, अशी खात्रीलायक माहिती बांधकाम खात्याचे उपविभागिय अधियंता विश्वास ओहाळ यांनी कळविली.

दरम्यान, बारामती-फलटण राज्यमार्गावरील पाहुणेवाडी हद्दीतील पुलासह रस्त्याला बुधवार (ता. १४) रोजी रात्रीच्यावेळी प्रचंड पावसाच्या पाण्याने मोठे भगदाड पडले होते. परिणामी पुलासह प्रशस्त डांबरी रस्ता जमिनदोस्त झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाने गुरूवारी पहाटेपासून (रात्री १)  सदरचा राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. सदरच्या रस्त्याची वाहतूक मर्यादित कालावधीसाठी बारामती-नीरा राजमार्गावर वळविण्यात आली आहे.

वास्तविक बारामती-फलटण राज्यमार्गाचे रुपांतर महामार्गात होणार आहे. अर्थात त्यानुसार चौपदरीकरणाचे कामही मागिल १० वर्षापुर्वी चालूही झाले होते. परंतु भूसंपादनाच्या पार्श्वभूमिवर संबंधित शेतकऱ्यांनी या कामाला न्यायालयामार्फत स्थगिती आणली होती. या प्राप्त स्थितीमुळे सदरच्या रस्त्याचे काम अनेक वर्ष अर्थवट अवस्थेत पडून होते. या केसचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल, परंतु मुळ राज्यमार्ग अद्ययावत करण्याची भूमिका मागिल अडीच वर्षापुर्वी शासनस्तराव घेण्यात आली. त्यानुसार १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करीत शासनानेमुळे रस्त्याचे डांबरीकरण, पडझड झालेल्या पुलांचे बांधकाम केले होते. त्याकामातच पाहुणेवाडी येथील पुलाची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली होती.

परंतु माळेगाव बुद्रूक, पाहुणेवाडी आदी भागातील पावसाच्या पाण्याचा आवाका आणि पुलाच्या मर्य़ादेचे सूत्र पुरेसे जुळले नाही. या प्रतिकूल स्थितीमुळे गतवर्षीपासून सातत्याने या पुलाची दुरावस्था होत आहे. या प्राप्त स्थितीचा अभ्यास करून बांधकाम खात्याने सदरील पुलाची व्याप्ती वाढविण्याचे सध्या मनावर घेतले आहे. त्यानुसार या कामाला सुमारे दीड कोटी रूपये उपलब्ध व्हावेत, असा मागणी प्रस्ताव वरिष्ठ कार्य़ालयात पाठविल्याची माहिती सांगण्यात आली. 

पावसाच्या पाण्याचा सर्वाधिक फटका सर्वच लहान मोठ्या रस्त्यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. सुरवातीला मुख्य रस्ते पुर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार बारामती-फलटण राज्यमार्ग पुर्वरत करण्याचे काम हाती घेतले आहे. पाहुणेवाडी हद्दीतील पाण्याची पातळी कमी होण्याची वाट पहावी लागली. आता पाणी कमी झाल्याने येथील पुलासह रस्त्याचे काम युद्धपाळवीवर सुरू झाले आहे. प्रशासनाने सुरवातीला सदर पुलाचा वाहून गेलेला मुरमाचा भरवा पुर्वरत करून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्याचे ठरविले आहे. शनिवारी दुपारपर्यंत सदरच्या पुलाच्या कामाची चाचणी घेवूनच रस्ता वाहतूकीसाठी खुला केला जाईल. त्या पार्श्वभूमिवर प्रवाशांनी सहकार्य़ाची भूमिका ठेवावी.-विश्वास ओहळ, उपविभागिय अभियंता   

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com