सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

खासगी वसतिगृहाच्या खोलीत राहणाऱ्या तरुणाला सिगारेट न ओढल्यामुळे त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, वारजे पोलिसांनी तरुणाच्या मित्राला अटक केली. ही घटना कर्वेनगरच्या गुरुप्रसाद कॉलनीतील पठाण वसतिगृहात मंगळवारी रात्री घडली.

पुणे - खासगी वसतिगृहाच्या खोलीत राहणाऱ्या तरुणाला सिगारेट न ओढल्यामुळे त्याच्या मित्राने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, वारजे पोलिसांनी तरुणाच्या मित्राला अटक केली. ही घटना कर्वेनगरच्या गुरुप्रसाद कॉलनीतील पठाण वसतिगृहात मंगळवारी रात्री घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सागर अशोक पवार (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय 30, रा. पठाण वसतिगृह, कर्वेनगर ) यास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दीपक पवार (वय 40, रा. वडार वस्ती, कर्वेनगर ) यांनी फिर्याद दिली आहे.

साधने असूनही स्मार्ट सिटी मागे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पुतण्या सागर पवार याने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. तो अनाथ असल्यामुळे आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने मार्केटिंग क्षेत्रातील एका खासगी कंपनीमध्ये कामाला लागला होता. तर कर्वेनगरमधील गुरुदत्त कॉलनीतील पठाण वसतिगृहात तो तीन दिवसांपूर्वीच राहण्यास आला होता.

पावसाने जिल्ह्यात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाले

त्याच्या खोलीमध्येच लक्ष्मण पाटील हा देखील राहात होता. दोन दिवसांपूर्वी पाटीलने सागरला सिगारेट ओढण्यासाठी आग्रह केला. मात्र सागरने त्यास नकार दिला. त्यानंतरही पाटीलने सागरला सिगारेट ओढण्यासाठी वेळोवेळी त्याच्यावर दबाव टाकला. तसेच पाटीलने त्यास सिगारेट न ओढल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या प्रकारामुळे सागर प्रचंड मानसिक तणावाखाली होती. पाटील याच्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून सागरने त्याच्या राहत्या खोलीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली, असे दीपक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. डी जाधव करीत आहेत.

लोहगाव विमानतळावरच आता आरटीपीसीआर चाचणी ! 

चिठ्ठीमुळे आत्महत्येचे कारण आले पुढे 
सागरने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने लक्ष्मण पाटील हा त्यास सिगारेट ओढण्यासाठी जबरदस्ती करत होता. तसेच सिगारेट न ओढल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे सागरने चिठ्ठीत नमूद केले आहे. संबंधित चिठ्ठी पोलिसांना मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी सागरला आत्महत्या करण्यास पाटीलला अटक केली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man commits suicide by hanging after refusing to smoke cigarettes