Baramati : अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिस 'अँक्शन मोड'मध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात अवैध व्यवसाय मोडीत काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना गणेश इंगळे यांना केली होती
Baramati : अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिस अँक्शन मोडमध्ये
Baramati : अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिस अँक्शन मोडमध्येsakal media

बारामती : येथील उपविभागातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अवैध व्यावसायिकांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात अवैध व्यवसाय मोडीत काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना गणेश इंगळे यांना केली होती, त्या नंतर पोलिस आता अँक्शन मोडमध्ये आले आहेत.

Baramati : अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिस अँक्शन मोडमध्ये
'24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

स्वताः गणेश इंगळे यांनी आपल्या पथकाच्या मदतीने अवैध व्यावसायिकांचा शोध सुरु केला आहे. बारामती शहर परिसरात दोन ठिकाणी अवैध हातभट्टी व त्याचे रसायन पोलिसांना मिळाले. यातील तिघांना अटक करण्यात आली असून दोघे जण पळून गेले. हनुमंत बबन लाड (वय 43, रा. बांदलवाडी ता.बारामती), मंगेश बबन लोंढे (रा.सुहासनगर आमराई ता.बारामती) या दोघांसह इतरही तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पुढील काळात अवैध गावठी हातभट्टी चालविणा-यांच्या घरातील कुटुंबियांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहिती गणेश इंगळे यांनी दिली. बारामती व इंदापूर तालुक्यातील अवैध दारुव्यवसाय करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही सुरु झाली आहे. अशा वारंवार गुन्हे करणा-या व्यावसायिकांवर झोपडपट्टी दादा कायदाअंतर्गत कारवाई होणार आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पोलिसांनी या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवून अवैध दारु व्यावसायिकांना दारु पुरविणा-या वाईन शॉप व बार मालकांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या दोनच दिवसात पोलिसांनी तब्बल 21 गुन्हे दाखल केले असून 24 जणांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे रोडसाईड रोमिओंवरही पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. दोन दिवसात तीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या पुढील काळात संध्याकाळच्या वेळेस पोलिस पथक शहरात फिरुन रोडसाईड रोमिओंवर कारवाई करणार आहे.

Baramati : अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी पोलिस अँक्शन मोडमध्ये
परमबीर सिंग फरार? न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

माझ्याशी संपर्क साधा...

अवैध दारु, मटका, जुगार, अंमली पदार्थ यांविषयक तक्रार असल्यास माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक 9011960200 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा असे आवाहन गणेश इंगळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com