esakal | पोलिस जनता दरबारात बारामतीत एकाच दिवशी १२८ अर्जांवर निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

police

पोलिस जनता दरबारात बारामतीत एकाच दिवशी १२८ अर्जांवर निर्णय

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : पोलिसांनी मनात आणले तर काहीही होऊ शकते याची प्रचिती आज बारामतीत आली. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात आज एकाच दिवशी बारामती शहर पोलिस ठाण्यात १०३ तर बारामती तालुका पोलिस ठाण्यातील २५ अर्जांवर निर्णय झाले.

स्वत: मिलिंद मोहिते यांनी दोन्ही पोलिस ठाण्यात हजर राहून अर्जदारांशी चर्चा केली. बारामती शहर पोलिस ठाण्यात ६५ प्रकरणात परस्पर तडजोड झाली. पोलिसांनी स्वत: प्रत्येक तक्रारदाराशी या वेळी चर्चा केली. लोकांचे समाधान करण्यासह आवश्यक तेथे प्रशासकीय कार्यवाही केली गेली.

हेही वाचा: बाजार समित्यांत उभारणार सौर प्रकल्प

शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे तर तालुका पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी अर्जदारांशी या बाबत चर्चा केली. काही प्रकरणातील मुद्देमाल व कागदपत्रांचे हस्तातंरही केले गेले. तर काही प्रकरणातील वाहने ताब्यात दिली गेली.

ज्यांच्या अर्जांवर निर्णय प्रलंबित होते त्या बाबत आज ब-यापैकी कार्यवाही झाल्यामुळे अशा प्रकारच्या जनता दरबारांचे आयोजन वेळोवेळी केले जावे अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली. पोलिसांनी मनावर घेतले तर एका दिवसात अर्जावर निर्णय होऊ शकतो हे आजच्या दरबारातून समोर आल्याचे काही जणांनी नमूद केले.

loading image
go to top