

Baramati Police Achieve 100 Percent Response On 1005 Dial 112 Calls With Quick Action Across Six Police Stations
esakal
बारामती : संकटाच्या वेळी नागरिकांनी डायल ११२ वर केलेल्या प्रत्येक कॉलला तातडीने प्रतिसाद देत बारामती उपविभागातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या दोन महिन्यांत उपविभागातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून प्राप्त झालेल्या एकूण १,००५ आपत्कालीन कॉलवर शंभर टक्के कार्यवाही करण्यात आली.