esakal | बारामती : व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी नगरसेवक आणि माजी सभापतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Suicide

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम शहा यांना दिलेल्या व्याजाच्या पैशांपोटी त्यांचा सहयोग सोसायटीमधील बंगला नावावर करुन घेण्याच्या कारणावरुन त्यांना सतत मानसिक त्रास दिला गेला.​

बारामती : व्यापाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी नगरसेवक आणि माजी सभापतीसह ९ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : शहरातील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांना व्याजाच्या पैशासाठी बंगला नावावर करुन घेण्यासाठी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी नऊ जणांवर बुधवारी (ता.११) गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विद्यमान नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि एका निवृत्त पोलिसाच्या मुलाचाही समावेश आहे. या प्रकरणी प्रतिक प्रीतम शहा यांनी फिर्याद दिली आहे. 

'शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला करा, नाहीतर आम्ही उघडू'; ब्राह्मण महासंघाचा इशारा

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम शहा यांना दिलेल्या व्याजाच्या पैशांपोटी त्यांचा सहयोग सोसायटीमधील बंगला नावावर करुन घेण्याच्या कारणावरुन त्यांना सतत मानसिक त्रास दिला गेला. त्या त्रासाला कंटाळून प्रीतम शहा यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता. प्रीतम यांनी स्वहस्ताक्षरात मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती. ही नोट त्यांच्या लेंगरेकर ट्रेडींग कॉर्पोरेशन या दुकानात होती. त्यांच्या मृत्यूनंतर दिवाळीच्या पाडव्याला जेव्हा दुकान उघडले गेले, तेव्हा दुकानात ही नोट सापडल्यानंतर त्यांचा मुलगा प्रतिक याने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. 

प्राध्यापकांचे पगार वेळेत करा, अन्यथा...; उच्च शिक्षण संचालक आदेशात काय म्हणाले?

या फिर्यादीवरुन पोलिसांनी जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (रा. भिगवण रोड, बारामती), जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे देशमुख (रा. देशमुख वस्ती, पाटस रोड, बारामती), संजय कोंडीबा काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती), विकास नागनाथ धनके (रा. इंदापूर रोड, बारामती), मंगेश ओंबासे (रा. सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (रा. खाटिकगल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (रा. अशोकनगर, जैन मंदीराशेजारी, बारामती), संघर्ष गव्हाळे (रा. बारामती), सनी उर्फ सुनील आवाळे (रा. खंडोबानगर, बारामती) या नऊ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 च्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यापैकी विकास धनके, मंगेश ओंबासे आणि संघर्ष गव्हाळे वगळता इतर सर्वांना पोलिसांनी अटक केल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले. दरम्यान या बाबतच्या फिर्यादीत प्रतिक यांनी त्यांच्या वडिलांच्या व्यवहारांबाबतची सविस्तर माहिती नमूद केली आहे. 

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)