esakal | Baramati : चोरी केलेला पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati :  चोरी केलेला पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

Baramati : चोरी केलेला पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माळेगाव : बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील  झालेल्या चोरीच्या गंभीर गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे. त्यामध्ये ५ लाख २८ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह चार आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (पुणे ग्रामीण) यश आले आहे. या प्रकरणी संशयित आरोपींना अटक केलेल्यांमध्ये युवराज आप्पाजी जगताप (वय ४८, रा.सासवड ता. पुरंदर जि. पुणे),  सत्यवान सर्जेराव सोनवणे (वय ४०, रा. सोनोरी ता. पुरंदर ), प्रमोद अरविंद खरात (वय २६, रा. शिरवली ता. बारामती ),  कादर कासीम शेख (वय ४९, निसर्ग हाईट तिसरा मजला प्लॅट नं,७ रा. मार्केटयाड -पुणे ) यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पोलिस पथकाचे अभिनंदन केले. पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अमोल गोरे,  शिवाजी ननावरे, अनिल काळे, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, काशिनाथ राजापुरे यांचा समावेश आहे.

हेही वाचा: पुण्यातील 900 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

दरम्यान, शिरवली  (ता.बारामती) येथील नीरा नदीचे बंधाऱ्याचे ३६००० हजार रुपये किंमतीचे एकूण २६ बर्गे  अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबतचा बारामती पोलिस ठाण्यात ३ सप्टेंबर २०२१ रोजी रोजी गुन्हा दाखल होता.  त्या अनुषंगाने गुरूवार (ता.९)  रोजी सांगवी (ता.बारामती) भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी संशयित एका बोलेरो पिकअप गाडीला ताब्यात घेतले.

तसेच त्यातील दोन संशयित इसमांकडे कसून तपास केला असता त्यांनी शिरवलीच्या नीरा नदीच्या बंधाऱ्यावर चोरी केल्याचे सांगितले. सदर चोरीचा माल कोंढवा- पुणे येथील भंगरवाल्यास विकल्याचेही संबंधितांनी सांगितले. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी चोरीला गेला माल व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप असा ५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनाही अटक केली.

loading image
go to top