बारामती पोलिसांना नाद करायचा नाय...कर्नाटकातून आणल्या चोरीच्या 31 दुचाक्या

मिलिंद संगई
Tuesday, 21 July 2020

कर्नाटकाच्या दुर्गम भागात जात लॉकडाउन व भाषेच्या अडचणींवर मात करत एकेक मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे एमआयडीसी पंचक्रोशीतील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश येण्याची अपेक्षा आहे. 

बारामती (पुणे) : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात बारामती तालुका पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. एका सराईत मोटारसायकल चोराला बोलते करुन तालुका पोलिसांनी तब्बल 31 मोटारसायकली हस्तगत करण्यात यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकाच्या दुर्गम भागात जात लॉकडाउन व भाषेच्या अडचणींवर मात करत एकेक मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे एमआयडीसी पंचक्रोशीतील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर अंकुश येण्याची अपेक्षा आहे. 

कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद..कारण..

मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप यांना सूचना दिल्या होत्या. बारामती तालुका पोलिसांच्या सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, सहायक फौजदार दिलीप सोनवणे,  नंदू जाधव,  मंगेश कांबळे,  विनोद लोखंडे,  होमगार्ड सचिन गायकवाड, शेखर आदलिंग, पोलिस मित्र मच्छिंद्र करे यांच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार अजित दशरथ आगरकर (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) याला ताब्यात घेऊन त्याला बोलते केले. त्याने बारामती शहर व पंचक्रोशीतून मोटारसायकल चोरून त्या कर्नाटकात मिळेल त्या किमतीला विकल्या होत्या, असे तपासात निष्पन्न झाले. 

पुण्यात नव्या निर्णयामुळे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आणि कुटुंबांना  दिलासा

लॉकडाउन व भाषेची अडचण असतानाही पोलिस पथकाने चिकाटी न सोडता विविध गावात दिवस रात्र फिरुन सुमारे 15 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 31 मोटारसायकली ताब्यात घेतल्या. हस्तगत केलेल्या मोटार सायकली बारामती तालुका, बारामती शहर, वालचंदनगर पोलिस स्टेशन हददीतून सन 2013 पासून चोरलेल्या आहेत. हँडल लॉक तोडून किंवा बनावट चावीने मोटारसायकल चोरायची व कर्नाटकात नेऊन विकायची, हा त्याचा क्रम होता. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कारवाईने आता बारामती परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर अंकुश बसेल, अशी अपेक्षा मिलिंद मोहिते व नारायण शिरगावकर यांनी व्यक्त केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati police seized 31 stolen motorcycles in Karnataka