बारामतीत पोलिसांना आता येणार `अच्छे दिन`

baramati police.jpg
baramati police.jpg

बारामती (पुणे) :  पंचक्रोशीतील पोलिस विभागाचे आता रुपडे पालटणार असून अनेक अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज नवीन इमारती आता बारामती व परिसरात तयार होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस विभागाच्या विविध कामांना आता गती देण्यास प्रारंभ केला असून येत्या दोन वर्षात बारामती पंचक्रोशीत पोलिस विभागासाठी अनेक दिलासादायक बदल होणार आहेत. या मध्ये पोलिस उपमुख्यालय, पोलिसांची निवासस्थाने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, बारामती शहर पोलिस ठाण्याची नवीन इमारत, बारामती वाहतूक शाखेची नवीन इमारत, वालचंदनगर, सुपे व माळेगाव पोलिस स्थानकाच्या नव्या इमारतींचा समावेश आहे. शनिवारी अजित पवार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी या बाबत सविस्तर चर्चा केली. या सर्व बाबींचा घेतलेला हा थोडक्यात आढावा....

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती पोलिस उपमुख्यालय....
बारामती दौंड रस्त्यावर ब-हाणपूर नजिक 66 एकर जागेत पुणे जिल्ह्याचे उपमुख्यालय साकारणार आहे. यापैकी 50 एकर जमीन पोलिसांच्या ताब्यात असून शेजारील 16 एकर जमिन पोलिसांकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव शासनदरबारी गेला आहे. पुण्याच्या मुख्यालयावरील ताण कमी करणे, तातडीच्या वेळेस पोलिसांची कुमक वेळेत पोहोचण्यासाठी हे मुख्यालय होणार. 
•    410 पदे मंजूर...पैकी 110 पदे पुणे ग्रामीणमधून तर 300 पदे नव्याने भरणार
•    प्रशासकीय व मुख्यालयाची इमारत साकारणार
•    अतिरिक्त पोलिस अधीक्षक दर्जाचा अधिकारी कामकाज पाहणार
•    अधिकारी व कर्मचारी निवासस्थाने होणार
•    प्रशिक्षण केंद्र व गोळीबार सराव केंद्र साकारणार
•    मोटार वाहन देखभाल दुरुस्तीचे काम होणार
•    गोंदिया, अहेरी व मालेगाव नंतर बारामतीत उपमुख्यालय साकारणार.
•    पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडे 100 कोटींची मागणी
•    पोलिस महासंचालकांच्या मान्यतेने आता शासनस्तरावर भरतीचा प्रस्ताव प्रलंबित. 

•    दोन कोटींच्या संरक्षक भिंतीचे काम लवकरच सुरु होणार. 


बारामतीत साकारणार तीन भव्य इमारती...
•    कविवर्य मोरोपंत नाट्यगृहाशेजारी साकारणार तीन भव्य इमारती
•    अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, बारामती शहर पोलिस ठाण्यासह बारामती वाहतूक शाखेच्या सुसज्ज इमारती होणार
•    सार्वजनिक बांधकाम विभाग 15 कोटींच्या या इमारती दोन वर्षात उभारणार
•    याच ठिकाणी मागील बाजूस अतिरिक्त कारागृह उभारण्याचा प्रस्ताव. 
•    कारागृहासाठी 89 गुंठे जागा पोलिसांना देण्यासाठी प्रस्ताव सादर
•    या कारागृहात 200 कैदी सामावतील इतकी प्रशस्त जागा असेल. 
•    चार एकर जागेवर तीन इमारती उभारल्या जाणार. 
•    कचेरीमधील पोलिस ठाणे नव्या इमारतीत स्थलांतरीत केले जाणार.
•    शहरातील वाहतूकीचे समन्वयन सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे वाहतूक शाखेतून होणार. 
तीन पोलिस ठाण्यांच्या नव्या इमारती होणार....
•    तालुक्यातील माळेगाव सुपे तसेच इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या नवीन सुसज्ज इमारती साकारणार.
•    वालचंदनगर पोलिस ठाणे भिगवण वालचंदनगर रस्त्यावर शेतीमहामंडळाच्या जागेत साकारणार.
•    पाच कोटींच्या या प्रकल्पामध्ये स्थानकासह चार अधिकारी निवासस्थानेही उभारली जाणार. 
•    महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण व कल्याण मंडळ ही इमारत बांधणार 
•    सुपे व माळेगावसाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून प्रत्येकी दोन कोटींची तरतूद
•    बारामती तालुक्यात माळेगाव व सुपे ही दोन नवीन पोलिस स्थानक अस्तित्वात येणार. पोलिस महासंचालकांची मंजूरी मिळाली असून गृहविभागात हा प्रस्ताव आहे. 
•    बारामती तालुक्यात बारामती शहर, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, सुपे व माळेगाव अशी पाच पोलिस ठाणी अस्तित्वात येणार. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे विभाजन होणार. 
•    सुपे येथे गावाबाहेर पोलिस स्थानकासाठी 100 गुंठे जागा मिळाली आहे. 

सर्वच पोलिसांना मिळणार निवासस्थाने.....
•    पोलिस लाईनमधील जुनी निवासस्थाने पाडून तेथे नवीन 192 निवासस्थाने उभारणार.
•    सात मजली सात इमारतीत दोन बेडरुम, किचन हॉल असलेली 550 स्क्वे.फूटांची सदनिका कर्मचा-यांना मिळणार. 
•    सध्या फक्त 74 निवासस्थाने होती, ही संख्या आता 192 वर जाईल. 
•    महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ इमारती उभारणार
•    52 कोटींचा खर्च या निवासस्थांनासाठी अपेक्षित. 
•    गार्डन लँडस्केपिंगसह सर्व इमारतींना लिफ्ट व इतर सुविधा दिल्या जाणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com