तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

पुण्यातील मराठा विचार मंथन बैठकीसाठी खासदार उदयनराजे येणार होते. परंतु ते बैठकीला का येऊ शकले नाहीत, माहिती नाही. दरम्यान, आजच्या बैठकीत 25 ठराव पारित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मेटे यांनी या वेळी दिला.

पुणे - पुण्यातील मराठा विचार मंथन बैठकीसाठी खासदार उदयनराजे येणार होते. परंतु ते बैठकीला का येऊ शकले नाहीत, माहिती नाही. दरम्यान, आजच्या बैठकीत 25 ठराव पारित करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मेटे यांनी या वेळी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याप्रकरणी मराठा समाजात असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्यासाठी मेटे यांनी शनिवारी (ता. 3) विचार मंथन बैठक बोलावली होती. या बैठकीस राज्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मेटे यांनी खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना स्वतः आजच्या बैठकीसाठी निमंत्रण दिले होते. परंतु या बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. या संदर्भात मेटे म्हणाले, उदयनराजे मला येतो म्हणाले होते. पण ते का आले नाहीत, माहिती नाही. परंतु साताऱ्यात ते लवकरच आरक्षणाबाबत बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुलीला भेटायचे तरी कसे? वडिलांसमोर प्रश्न; एकतर्फी आदेश थांबल्याने वाढली अडवणूक

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती  शरद पवार यांना करीत आहे. कारण हे सरकार पवार यांचा शब्द खाली पडू देत नाही. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा स्थगित न केल्यास 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लस कोरोनावर ठरतायेत उपयुक्त? पुण्यात बीसीजी लसीवर होणार संशोधन

ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाबाबत एकमत नाही
ओबीसी प्रवर्गातील कोट्यातून आरक्षण नको, अशी भावना काही मराठा संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केली. परंतु याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे हा ठराव पारित करण्यात आला नाही, असे मेटे यांनी या वेळी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha community streets november vinayak mete warning