
बारामती/माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरू-शिष्य समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्या जोडीला जोरदार धक्का देत कारखान्यावर एकहाती सत्ता राखली आहे. माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचा विजय झाला असून, रंजनकुमार तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. त्यावर, ‘अजित पवार यांनी बोलले ते करून दाखविले...’ या शब्दांत कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवली.