बारामतीहून पुण्याला जाणं होणार अधिक वेगवान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

जेजुरी मोरगाव रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता मोरगाव बारामती या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

बारामती : येत्या काही महिन्यात बारामतीहून पुण्याला जाणे अधिक गतीमान होणार आहे. बारामती ते दिवेघाट हे अंतर अवघ्या सव्वा तासावर येईल अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हायब्रीड अँन्युईटी कार्यक्रमाअंतर्गत जेजुरी-मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नरसिंहपूर या 83 कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण व नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे. यातील जेजुरी मोरगाव रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता मोरगाव बारामती या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दोन्ही बाजूंच्या साईडपट्टया मजबूत करुन सात मीटर रुंदीचा रस्ता आता दहा मीटर रुंदीचा केला जाणार आहे. या मुळे एकाच वेळेस तीन वाहने आरामात एकमेकांजवळून निघून जाऊ शकतील. ओव्हरटेक करतानाही अपघाताचा धोका यामुळे कमी होईल व प्रवासाचा कालावधी कमी होऊन वेग वाढेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तसेच मधोमध थर्मोप्लास्टने पांढरे पट्टे मारले जाणार आहेत. या मुळे रात्रीच्या वेळेसही वाहन चालविताना चालकांना सोपे पडेल. यामध्ये भूसंपादन करण्याचा विषय नसून फक्त साईडपट्ट्या वाढवून रस्त्याची सात मीटरची रुंदी दहा मीटर होणार असल्याने कामही वेगाने सुरु आहे. काही ठिकाणी पूलांचे रुंदीकरणही करावे लागणार असून पहिल्या टप्प्यात रस्त्याचे काम करुन दुसरीकडे पूलांचे रुंदीकरणही होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जेजुरी व मोरगाव ही दोन राज्याच्या दृष्टीने महत्वाची तीर्थक्षेत्र असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे होते. इंदापूर व बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी हा महत्वाचा रस्ता होईल. या मध्ये दहा वर्षे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च संबंधित कंत्राटदारच करणार असल्याने याचा शासनावर भुर्दंड पडणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नवीन रस्त्याच्या कामानंतर बारामती ते मोरगाव हे 34 किमीचे अंतर वीस मिनिटात तर मोरगाव ते जेजुरी हे अंतर दहा मिनिटात पार करणे शक्य होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati to Pune Travel speedy soon