Radhika Shaha : बारामतीच्या राधिका शहांना ऑस्ट्रेलियाचे निमंत्रण....; आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करणार शोधनिबंध...

ऑस्ट्रेलियामधील मेलर्बन येथे सप्टेंबर महिन्यात होणा-या आंतरराष्ट्रीय आयएफएसओ कॉंग्रेससाठी राधिका यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
Radhika Shaha
Radhika Shahasakal

बारामती - इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ ओबेसिटी अँड मेटॉबॉलिक डिसऑर्डर (आयएफएसओ) यांच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती बारामतीच्या राधिका मिलिंद शहा (वाघोलीकर) यांना जाहीर झाली आहे. जगातील फक्त दहाच जणांना ही शिष्यवृत्ती मिळाली असून भारतातील शिष्यवृत्तीप्राप्त त्या एकमेव आहेत. या क्षेत्रात राधिका यांनी केलेले आजवरचे काम विचारात घेत त्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामधील मेलर्बन येथे सप्टेंबर महिन्यात होणा-या आंतरराष्ट्रीय आयएफएसओ कॉंग्रेससाठी राधिका यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जगभरातील 73 देशांमधील स्थूलपणावर शस्त्रक्रीया व उपचार करणारे नामांकीत डॉक्टर्स या कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत.

या कॉंग्रेससाठी राधिका यांना या संस्थेने आपणहून आमंत्रित केलेले असून या ठिकाणी होणा-या परिषदेमध्ये त्यांना शोधनिबंध सादर करता येणार आहे. जगभरातील ज्या रुग्णांना उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांना सर्वोत्तम दर्जाचे उपचार प्राप्त कसे करुन देता येतील, या साठी ही संस्था प्रयत्नशील असते.

स्थूलपणावर शस्त्रक्रीया, शस्त्रक्रीयापश्चात योग्य उपचार व देखभाल अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने जगभरातील या विषयातील तज्ज्ञ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले शोधनिबंध व केलेल्या उपचारांची माहिती सादर करतात. राधिका शहा यांनाही त्यांनी भारतात केलेल्या या कामाचे सादरीकरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर या निमित्ताने सादर करता येणार आहे.

या पूर्वीही राधिका शहा यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी आपले शोधनिबंध सादर केलेले असून स्थूलपणावर मात करण्यासाठी त्यांचे संशोधन अनेकांसाठी वरदान ठरलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com