
बारामती - परिसराचे गेल्या काही वर्षात वेगाने झालेले नागरीकरण, रस्ते वाहतूकीवरील वाढलेला ताण, वाहतूककोंडीमुळे लागणारा वेळ, रस्ते वाहतूकीचा वाढलेला खर्च विचारात घेता बारामती पुणे बारामती या मार्गावर रेल्वेने लोकल सेवा सुरु करावी अशी बारामतीकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.