

Class 11 Student Dies in Baramati Amid Exam Pressure Police Investigate Possible Stress and Other Circumstances
esakal
बारामती : भिगवण रस्त्यावरील एका निवासी इमारतीत राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी घेतल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची प्राथमिक माहिती तिच्या पालकांनी पोलिसांना दिली असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी सर्व बाजूंनी चौकशी सुरू केली आहे.