
Sanjay Raut : बारामतीत खासदार संजय राऊत यांच्याविरुध्द तक्रार!
बारामती - खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुध्द अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी बारामतीतील एकनाथ शिंदे यांचे समर्थक व पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी पोलिसात अर्ज दाखल केला आहे.
बारामती शहर पोलिस निरिक्षकांकडे त्यांनी एका अर्जाद्वारे ही तक्रार दाखल केली असून यात संजय राऊत यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. यात जेवरे यांनी नमूद केले आहे की, शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्ह मिळण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला,
असे चुकीचे व लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे, या शिवाय निवडणूक आयोग व निवडणूक आयुक्तांबाबतही लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे समाजात द्वेष निर्माण होऊ शकतो, त्या मुळे याची दखल घेत राऊत यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.