गॅस कटरनं फोडली दुकानं अन् चोरट्यांनी आईस्क्रीमवरही मारला ताव

मिलिंद संगई
Sunday, 27 December 2020

सुख शांती अपार्टमेंटमधील ही पाच दुकाने आहेत. कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर अशी पाच दुकाने गॅस कटर व मोठ्या कात्रीने उघडून त्यातील रक्कम लंपास केली गेली.

बारामती : शहरातील शिवाजी चौकातील वर्दळीच्या ठिकाणची पाच दुकाने मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरने फोडत रोकड चोरुन नेली. या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा हा प्रकार कैद झाला असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सुख शांती अपार्टमेंटमधील ही पाच दुकाने आहेत. कलर पेंट, चप्पल शूज, डिझाईनिंग आणि आइस्क्रीम पार्लर अशी पाच दुकाने गॅस कटर व मोठ्या कात्रीने उघडून त्यातील रक्कम लंपास केली गेली. रात्रीची आणि दिवसाची गस्त सुरु असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून भर चौकातील दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिल्याची बारामतीत चर्चा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकीकडे पोलिसांची सावकारांसह इतर बाबींवर मोहिम सुरु असताना दुसरीकडे नियमित होणाऱया चोऱ्यांच्या घटनांनी बारामतीकरांची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे. ही दुकाने फोडल्यानंतर एका आईसक्रीम पार्लरमध्ये असलेल्याआईसक्रीमवर चोरट्यांनी निवांत तावही मारला. चोरट्यांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याचेच हे निदर्शक असल्याची आज शहरात चर्चा होती. 
कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Baramati thieves broke into five shops with gas cutter