

baramati traffic police recovered 17 stolen motorcycles fake number plate
Sakal
बारामती : पोलिसांची नजर किती बारिक असते आणि त्यांच्या नजरेतून चोर सुटू शकत नाही असे म्हणतात त्याचा प्रत्यय बारामतीत आला. बारामतीच्या हॉटेल चैत्राली नजिक 21 जुलै रोजी दुपारच्या सुमारास कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी दत्तात्रय हनुमंत भोसले व आकाश प्रल्हाद कांबळे नेहमीप्रमाणे वाहन तपासणी करत होते.